satyaupasak

दाऊदला फरफटत आणणार, मग वाल्या कराडला का नाही? आव्हाडांचा फडणवीसांना थेट सवाल

तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होतात. मग वाल्या कराडला आणण्यात काय अडचण आहे? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर तीव्र टीका केली.

Jitendra Awhad : तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होतात. मग वाल्या कराडला आणायला काय अडचण आहे? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर निशाणा साधला. मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेतल्याचे आव्हाड म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. लोकांची स्मरणशक्ती कमी आहे. लोक विसरून जातील. याची ते वाट पाहत आहेत, असेही आव्हाड म्हणाले. 302 मध्ये वाल्मिक कराड यांचे नाव नाही. मोक्का लावू, असे सभागृहात सांगितले होते, मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही, असे आव्हाड म्हणाले.

302 चा गुन्हा दाखल मात्र त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगूनदेखील या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवार यांनी अद्याप कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही, असेही आव्हाड म्हणाले. उलट सभागृहात अजित पवार यांनी सुरेश धस यांना डोळा डोळा म्हणत खुणा केल्या, असे आव्हाड म्हणाले. त्यांचा हेतू काय होता, हे मला माहित नाही, असे आव्हाड म्हणाले. अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर पवारसाहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते, असे आव्हाड म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सूत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेते करत आहेत. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घालण्यात येत असल्याचेही नेत्यांनी म्हटले होते. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा आणि सरकारवर वाढत असलेला राजकीय आणि सामाजिक दबाव लक्षात घेऊन आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *